Official Website
माझा संघर्ष: माझा जीवन लढा
ज्याला कुणाला आपण आणि आपलं सोडून समाजासाठी किंवा मानव जातीसाठी काही करायची इच्छा असेल तर त्याने हे पुस्तक अवश्य वाचावे. डॉक्टर अनंत काशिनाथ पाटील यांचा जीवन प्रवास निश्चितच प्रेरणादायक, आश्वासक आणि मार्गदर्शक ठरेल. समाजासाठी किंवा मानव जातीसाठी काहीतरी करावे या उपजत प्रेरणेने जर कोणी अस्वस्थ होत असेल तर त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच चांगल्या मार्गदर्शकाचे काम करू शकेल



My Story
डॉ. अनंत काशिनाथ पाटील
रायगड जिल्ह्यातील जोहे गावचे रहिवासी डॉ. अनंत काशिनाथ पाटील यांनी शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि समाजकारणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे.
शालेय शिक्षणानंतर त्यांनी डिप्लोमा इन होमिओपॅथी अँड बायोकेमिस्ट्री (DHB) पूर्ण केला आणि 1963 पासून वैद्यकीय सेवा सुरू केली. सामाजिक बांधिलकीतून ग्रामविकास मंडळ (1957), न्यू इंग्लिश स्कूल, जोहे (1961) यांसारख्या संस्थांची स्थापना केली.
ते पेण पंचायत समिती सदस्य (1967-1972), ग्रामपंचायत सरपंच (1967-1977), कृषि उत्पादन बाजार समिती सदस्य (1977-1987) अशा विविध पदांवर कार्यरत होते.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलाने शिक्षणाच्या जोरावर उभा केलेला असामान्य प्रवास—समाजसेवेसाठी वाहून घेतलेले संपूर्ण आयुष्य! संघर्ष, जिद्द आणि समाजउन्नतीचा ध्यास यांची प्रेरणादायी कहाणी.